हिंदूत्वाची व्याख्या आम्हाला शिकवू नये : शीतल म्हात्रेंचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर | पुढारी

हिंदूत्वाची व्याख्या आम्हाला शिकवू नये : शीतल म्हात्रेंचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो लावून निवडून या, त्यानंतर खरे हिंदूत्व काय ते समजेल. हिंदूत्वाची व्याख्या आम्हाला शिकवू नये, असे प्रत्युत्तर शिंदे गटाच्या प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांना दिले.

शिवसेनेत बंड करून शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांचा शिवेसेना प्रमुख उद्धव ठाकरे व आमदार आदित्य ठाकरे यांनी गद्दार असा उल्लेख करत आहेत. शिंदे गटातील आमदांनी राजीनामा द्यावा व पुन्हा निवडणूक लढवावी, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे. यावर शितल म्हात्रे यांनी प्रत्युत्तर दिले.

गद्दारी, पाठीत खंजीर खूपसणे, विश्वासघात या शब्दांची व्याख्या समजून घेतली तर बरं होईल. आपण आमदार झाला तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून मते मागितली. त्यामुळे आपण आमदार होण्यामध्ये भाजपची मते आहेत; पण महाविकास आघाडी स्थापन करून बाळासाहेबांच्या विचाराशी तुम्ही गद्दारी केली. मतदारांच्या पाठीत खंजीर खूपसला आहे. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेवून पुढे जात आहे. त्यामुळे राजीनामा द्यायचा असेल तर तुम्ही द्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोटो लावून निवडणूक लढवा, असे म्हात्रे यांनी म्हटलं आहे.

nbsp;

हेही वाचा :

Back to top button