क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक पडली महागात

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक पडली महागात
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : व्हर्चुअल करन्सीमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळविण्याची हाव माझगावमधील एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. तरुणीने यात तब्बल 4 लाख रुपये गमावले.

माझगाव परिसरात राहत असलेली अल्फीया (31) ही लोअर परळमधील एका खासगी कंपनीत नोकरी करते. ती व्हर्चुअल करन्सीबाबत इंटरनेटवर माहिती घेत असायची. त्यासाठी तिने आपल्या मोबाईलमध्ये अ‍ॅपवर्क हे अ‍ॅप डाउनलोड केले होते. 5 ऑगस्ट रोजी तिला एका अनोळखी नंबरवरुन मेसेज आला. त्याने अल्फीया हिला व्हर्चुअल करन्सीबाबत माहिती दिली. त्यानंतर त्याने व्हॉटस्अ‍ॅप आणि टेलीग्रामची लिंक पाठवत त्यावर माहिती भरण्यास सांगितले.

अल्फीया हीने आपल्या नावासह सर्व माहिती त्यात भरली. त्यानंतर बोनी नावाच्या व्यक्तीने तिला कॉल करत टेडींग प्लटफॉर्मवर एक नवीन बिझनेस आहे. युएसए बेन फंड मॅनेजमेंट यात क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास 5 हजार रुपयांच्या मोबदल्यात दुसर्‍याच दिवशी 8 टक्के मोबदला मिळेल आणि त्यापेक्षा गुंतवणूक केल्यास 30 टक्के रक्कम एका दिवसात अधिक मिळेल, असे आमिष दाखविले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अल्फीयाने बिनान्स हे अ‍ॅप डाऊनलोड केले. दुसर्‍या दिवशी अ‍ॅपवर 21 कॉईन जमा झाले. त्यामुळे तिचा या अ‍ॅपवर विश्वास बसला. त्यानंतर अल्फीया हिने बीनान्स कॉईन परचेस ट्रान्सफर टू बीटनन्स डॉट कॉम वेबसाईट – युएसए बेन फंड मॅनेजमेंट या कंपनीत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. अल्फीया हिने एकूण 3 लाख 98 हजार रुपयांची गुंतवणूक यात केली. गुंतवणूक करत असल्याप्रमाणे वेबसाईटवर रक्कम वाढत होती. त्यामुळे चांगला परतावा मिळेल, असे तिला वाटू लागले. त्यामुळे अल्फीया हिने ही गुंतवणूक केली होती. 14 ऑगस्ट रोजी अल्फीया हिला ही वेबसाईट बनावट असल्याचे कळाले.

वारंवार पैशांची मागणी केल्यानंतर ही रक्कम खात्यात जमा करण्यासाठी पैशांची मागणी होऊ लागली. मात्र अल्फीया आणखी पैसे भरण्याच्या मनस्थितीत नव्हती. या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर अखेर तिने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तिने भायखळा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news