अनिल परब यांना ‘ईडी’ ची नोटीस! | पुढारी

अनिल परब यांना ‘ईडी’ ची नोटीस!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. मंत्री परब यांना मंगळवार दि. ३१ रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. १०० कोटींच्या वसुली प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत आपल्या ट्विटर अकाउंट ट्विट केले आहे.

रत्नागिरीतील जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वक्तव्यानंतर ही अटक करण्यात आली. या अटकेसाठी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब रत्नागिरी पोलिसांना सूचना करत होते. ही संपूर्ण घटना वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली. दरम्यान, अनिल परब यांना पाठवण्यात आलेली ईडीची नोटीस ही नारायण राणे यांच्या अटकेनंतर केंद्र सरकारने सूडबुद्धीने केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

 

खासदार राऊत यांच्या आरोपांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ईडी पुराव्याशिवाय कोणतीही कारवाई करत नाही. त्याच्याकडे अनिल परब यांच्या विरोधात निश्चितपणे काही पुरावे आहेत, त्यानंतरच नोटीस पाठवण्यात आली असणार असं दरेकर म्हणाले आहेत.

Back to top button