नाटककार, लेखक, ज्येष्ठ पत्रकार जयंत पवार यांचे निधन | पुढारी

नाटककार, लेखक, ज्येष्ठ पत्रकार जयंत पवार यांचे निधन

मुंबई, पुढारी ऑनलाईन: ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे निधन झाले.पवार यांच्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या कथासंग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार तर तर काय डेंजर वारा सुटलाय या नाटकास अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला होता.

त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी पत्रकार, लेखिका संध्या नरे व मुलगी असा परिवार आहे.

मराठी साहित्यातील महत्त्वाचे नाव असलेले पवार गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. शनिवारी राक्षी त्यांना अस्वस्थ वाटू लागलेल होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान जयंत पवार यांचे निधन झाले.

नाटककार आणि लेखक अशी त्यांची ओळख. त्यांच्या अनेक साहित्यकृती राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर गाजल्या.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते.

२०१४ मध्ये महाड येथे झालेल्या १५ व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे पवार अध्यक्ष होते.

२०१२ मध्ये ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता.

 

जयंत पवार यांची ‘अंधातर’, ‘काय डेंजर वारा सुटलाय’, ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन’, ‘दरवेशी’, ‘पाऊलखुणा’,‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’

(कथासंग्रह), बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक, ‘माझे घर’, ‘वंश’, ‘शेवटच्या बीभस्ताचे गाणे’, ‘होड्या’(एकांकिका) ,

‘वरनभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ (कथासंग्रह) यांसह अन्य साहित्य प्रकाशित आहे.

पवार यांनी दीर्घकाळ पत्रकार म्हणून काम केले. मराठी साहित्यात भूमिका घेऊन लिहिणाऱ्या लेखकांपैकी ते एक होते.

मराठी नाट्यवर्तुळात पवार यांच्या नाटकांनी मैलाचे दगड उभे केले.

हेही वाचा: 

Back to top button