मध्य रेल्वेच्या एसी लोकलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद | पुढारी

मध्य रेल्वेच्या एसी लोकलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद

मुंबई पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवाशांनी एसी उपनगरीय लोकल रेल्वेला उदंड प्रतिसाद दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत एसी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये दररोजच्या सरासरी ५,९३९ प्रवासी संख्येवरून जुलै २०२२ मध्ये ३४,८०८ प्रवासी झाले. वाहतूक जवळपास ६ पटीने वाढली आहे.

शहर आणि उपनगरातील वातानुकूलित वाहतूक व्यवस्थेच्या इतर साधनांच्या तुलनेत एसी उपनगरीय लोकलने प्रवास करणे केवळ जलदच नाही तर सर्वात किफायतशीर आहे. या वस्तुस्थितीमुळे एसी लोकलला मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे. दि. ५.५.२०२२ पासून सिंगल ट्रॅव्हल तिकिटाचे दर ५० टक्के कमी केल्यानंतर प्रतिसादही वाढला आहे.

फेब्रुवारी २०२२ ते जुलै २०२२ या कालावधीतील तिकीट विक्रीच्या (सिंगल आणि सीझन तिकीट दोन्ही) बाबतीत मध्य रेल्वेची खालील ५ टॉप स्थानके आहेत.

डोंबिवली – ९४,९३२ तिकिटे
ठाणे – ८४,३०९ तिकिटे
कल्याण – ७७,४१२ तिकिटे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – ७०,४४४ तिकिटे
घाटकोपर – ५३,५१२ तिकिटे

प्रवाशांना आरामदायी प्रवास देण्याच्या प्रयत्नात मध्य रेल्वे आघाडीवर आहे. आणि एसी लोकल चालवणे हे त्यापैकीच एक आहे. एसी लोकलला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे प्रवाशांना सर्वोत्तम सेवा देण्याच्या मध्य रेल्वेच्या प्रयत्नांना चालना मिळाली आहे. ही माहिती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथील मध्य रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आली.

हेही वाचा

Back to top button