एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शंभर कोटींचा निधी | पुढारी

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शंभर कोटींचा निधी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या जूनच्या वेतनासाठी राज्य शासनाने १०० कोटी रुपये इतका निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी ३६० कोटी इतक्या निधीची आवश्यकता असल्यामुळे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी निधी उपलब्ध करण्याची मागणी शासनाकडे केली होती. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात १४५० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामधून ३०० कोटी रुपये महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या एप्रिल २०२२ च्या वेतनासाठी शासनाने वितरित केला होता.

त्यानंतर मे २०२२ च्या वेतनसाठी ३६० कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात तरतूद केलेल्यापैकी सध्या ७२० कोटी रुपये शिल्लक आहे. त्यामधून ३६० कोटी इतका निधी जून, २०२२ च्या वेतनासाठी वितरित करण्याबाबत वित्त विभागास विनंती केली होती. त्यानुसार १०० कोटी रूपये इतकी रक्कम परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या जून २०२२ च्या वेतनासाठी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. मंगळवारी (दि.२) रोजी शासनाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button