मुंबई : आग्रीपाड्यात सेंट जोसेफ अनाथाश्रमातील २२ मुलं कोरोना पॉझिटिव्ह | पुढारी

मुंबई : आग्रीपाड्यात सेंट जोसेफ अनाथाश्रमातील २२ मुलं कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईमध्ये अनाथाश्रमातील २२ मुलं कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये १२ वर्षाखालील मुलांचाही समावेश आहे.

या बाधित मुलांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १२ वर्षाखालील ४ मुलांना नायर रुग्णालयाच्या पेडियाट्रिक वॉर्डमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

दुसरीकडे १२ वर्षांवरील मुलांना रिचर्डसन अँड क्रूडस येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अनाथाश्रमात कोरोना रुग्ण आढळत असताना तिथे कॅम्प घेण्यात आला. यामध्ये ९५ लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये २२ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button