काेल्‍हापूर : रंकाळावेश गोल सर्कल मित्र मंडळाच्‍या बाप्पाचे मुंबईतून प्रस्‍थान | पुढारी

काेल्‍हापूर : रंकाळावेश गोल सर्कल मित्र मंडळाच्‍या बाप्पाचे मुंबईतून प्रस्‍थान

मुंबई पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रंकाळावेश गोल सर्कल मित्र मंडळाची गणेशमूर्ती लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष कांबळे यांनी बनवली आहे. त्यांच्या लालबाग मुंबई येथील गणेश कार्यशाळेतून कोल्हापूरच्या राजाचे कोल्हापूर दिशेने दुपारी दीडच्या सुमारास प्रस्थान झाले आहे. यावेळी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.

मुंबईतील गणेश चित्र शाळेतून बाहेर निघणारा हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा पहिलाच गणपती आहे. कोल्हापूरच्या रंकाळावेश गोल सर्कल मित्र मंडळाचा हा बाप्पा असून, या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा 9 वे वर्ष आहे.

हेही वाचा

Back to top button