मुंबई : ओबीसीच्या ५३ प्रभागांची यादी केली होती प्रसिद्ध, पुढारीची बातमी तंतोतंत ठरली खरी! | पुढारी

मुंबई : ओबीसीच्या ५३ प्रभागांची यादी केली होती प्रसिद्ध, पुढारीची बातमी तंतोतंत ठरली खरी!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; दैनिक पुढारीने 22 जुलैला आरक्षण सोडत कशाप्रकारे काढणार व 53 प्रभागांची यादी प्रसिद्ध केली होती. या यादीप्रमाणेच आरक्षण सोडतीत प्राधान्य क्रम 1 प्रमाणे ओबीसी प्रभाग निश्चित करण्यात आले. त्यामुळे पुढारीची बातमी तंतोतंत खरी ठरली आहे.

आरक्षणाची तारीख जाहीर होण्याअगोदर म्हणजे 22 जुलैला दै. पुढारीमध्ये ओबीसी प्रभाग आरक्षणासंदर्भात बातमी प्रसिद्ध झाली होती. या बातमीत 2007, 2012 व 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत जे प्रभाग खुल्या प्रवर्गातील होते, त्या प्रभागात ओबीसी आरक्षण पडणार असल्याचे प्रसिद्ध केले होते. त्यानुसार 53 प्रभाग ओबीसी आरक्षित होणार हेही जाहीर केले होते. एवढेच नाही तर त्या प्रभागांची यादीही प्रभाग क्रमांकनुसार प्रसिद्ध करण्यात आली होती. शुक्रवारी बांद्रा पश्चिमेकडील बालगंधर्व सभागृहात काढण्यात आलेल्या सोडतीत सुरुवातीलाच 53 प्रभाग प्राधान्य क्रमांक एकमध्ये असल्याचे सांगून त्या प्रभाग क्रमांकची यादी निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली. पुढारीची बातमी तंतोतंत घरी ठरल्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी फोन करून, पुढारीचे कौतुक केले.

हेही वाचा

Back to top button