मी असं काय बोललो ज्याचा शिवसेनेला राग आला? : नारायण राणे | पुढारी

मी असं काय बोललो ज्याचा शिवसेनेला राग आला? : नारायण राणे

मुंबई; पुढारी ऑनलाईन : कानशिलात वक्तव्यावरून अडचणीत आल्यानंतर अटक झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयातील निकाल माझ्या बाजूने लागला असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. मी असं काय बोललो ज्याचा शिवसेनेला राग आला? अशी विचारणा त्यांनी केली.

देश कायद्याने चालतो हे सिद्ध झालं असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी अनेक वक्तव्ये केली असल्याचे ते म्हणाले. माझ्या चांगूलपणाचा फायदा घेत जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

नारायण राणे काय म्हणाले?

 • तुम्हालाही मुलबाळं आहेत, तुम्हालाही घरदार आहेत हे लक्षात ठेवा
 • मुख्यमंत्री थोबाड फोडण्याची भाषा करतात त्याचे काय?
 • शिवसेना वाढली त्यात माझा मोठा सहभाग
 • आता जपून पावलं टाकली पाहिजेत
 • परवापासून जन आशीर्वाद यात्रा सुरु करणार
 • शिवसेनेच्या अनेक नेत्यांनीही वक्तव्ये केली आहेत
 • राष्ट्राबद्दल अज्ञान दाखवलं म्हणून आम्ही बोललो
 • गृहखाते अनिल परबांकडे की दिलीप वळसे पाटलांकडे?
 • अनिल परबांविरोधात गुन्हा दाखल करणार
 • संजय राऊत संपादकपदाच्या लायकीचे नाहीत
 • मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी संजय राऊत अग्रलेख लिहितात
 • मला अटक केली नव्हती, पोलिसांच्या विनंतीवरून स्वत: कोर्टात गेलो
 • कोर्टाच्या निर्बंधामुळे तो शब्द उच्चारणार नाही
 • भाजप माझ्यमागे खंबीरपणे उभा राहिला
 • आयुष्यात उंदीर कधी मारला नाही, ते कोथळा काय काढणार?
 • ठाकरेंनी युपीच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरले

 

Back to top button