डिसले गुरूजी उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी मंत्रालयात दाखल | पुढारी

डिसले गुरूजी उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी मंत्रालयात दाखल

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसले गुरुजींना भेटण्यास बोलावल्याची माहिती आमदार गिरीष महाजन यांनी काल दिली होती.

भाजप आमदार गिरीष महाजन यांनी डिसले गुरुजींना फोन केला होता. यावेळी डिसले गुरुजींनी राजीनामा देऊ नये, तो मागे घ्यावा. तसेच गुरुजींचे बोलणे ऐकून घेण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी डिसलेंना बबोलावले आहे, असे महाजन म्हणाले होते.

सोलापूरचे शिक्षक रणजीत डिसले यांनी राजीनामा दिला आहे. ६ जुलै रोजी रणजितसिंह डिसले यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्यासंदर्भातील पत्र शिक्षण विभागाकडे दिले आहे. डिसले यांच्या राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या प्रकरणाबाबत आम्ही दोघांचेही म्हणणे एकूण घेऊ. मात्र, अशा प्रकारे गुरुजींनी राजीनामा देण योग्य होणार नाही. त्यातून नक्कीच आम्ही मार्ग काढू असेही महाजन म्हणाले होते.

जागतिक पुरस्कार विजेते सोलापूरचे शिक्षक रणजीत डिसले यांनी राजीनामा दिला आहे. 6 जुलै रोजी रणजितसिंह डिसले यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्यासंदर्भातील पत्र शिक्षण विभागाकडे दिले आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नावलौकिक करणाऱ्या शिक्षकाला शासनाची नोकरी का सोडावी वाटली हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शाळेचा पासवर्ड वापरून स्वत:चा पगार काढला

शालार्थ वेतन प्रणालीचा आयडी व पासवर्ड वापरून ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी स्वत:चा पगार काढल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. यामुळे डिसले गुरुजी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

डिसले गुरुजींनी डायट काळात काम केले की नाही, याबाबत चौकशी करण्यासाठी पाच जणांची चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीचा अहवाल जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर सादर करण्यात आला आहे. या अहवालात डिसले गुरुजींवर वरील आरोप ठेवण्यात आला आहे.

माढा तालुक्यातील परितेवाडी येथील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी डिसले गुरुजी यांचे प्रतिनियुक्ती कालावधीत डायट येथील उपस्थिती अहवाल न घेता वेतन काढले. यादरम्यान डिसले गुरुजी कुठे होते? याबाबत त्यांनी उपस्थिती प्रमाणपत्र शाळेत सादर केले नाही. या संदर्भात चौकशी समितीच्या सदस्यांनी मुख्याध्यापकांना विचारले असता शालार्थ प्रणालीच्या आयडी व पासवर्डचा वापर करुन रणजितसिंह डिसले यांनीच परस्पर वेतन काढल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button