मुंबई : जलवाहिनी फुटल्याने परळ,काळाचौकी, शिवडी ,वडाळा, माटुंगामध्ये पाणीपुरवठा बंद

मुंबई : जलवाहिनी फुटल्याने परळ,काळाचौकी, शिवडी ,वडाळा, माटुंगामध्ये पाणीपुरवठा बंद
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दादर पूर्वेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पारसी जिमखाना समोर 1200 मिमी व्यासाची (नवीन तानसा) जलवाहिनी फुटल्यामुळे पालिकेच्या परळ, माटुंगा, दादर, काळाचौकी, शिवडी, वडाळा भागाला शुक्रवारी पहाटे 4 ते सकाळी 10 या वेळेत पाणी पुरवठा होणार नाही, असे महापालिकेने कळवले आहे.

दरम्यान जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून हे काम लवकरच पूर्ण होईल, असे पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले.

या भागात पाणीपुरवठा होणार नाही

माटुंगा एफ – उत्तर विभाग
दादर पूर्व, माटुंगा, वडाळा, पारसी कॉलनी, हिंदू कॉलनी,
परळ एफ-दक्षिण विभाग
दादर, नायगाव, लालबाग, वडाळा, परळ, काळाचौकी, शिवडी.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news