मुंबई : अश्‍लील फोटोंची धमकी देत अत्याचार | पुढारी

मुंबई : अश्‍लील फोटोंची धमकी देत अत्याचार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच ख्वाजा फैयादिन खाजा शेख या आरोपीस बीकेसी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित विवाहित महिला कुर्ला परिसरात तिच्या पती आणि मुलांसोबत राहते. काही महिन्यांपूर्वीच तिची ख्वाजा शेखशी ओळख झाली होती.
मार्च 2021 रोजी त्याने तिला पतीच्या कामाच्या बहाण्याने बीकेसी येथे बोलाविले होते. तेथून ते दोघेही एका हॉटेलमध्ये गेले होते. तिथेच त्याने या महिलेचे अश्‍लील फोटो त्याच्या मोबाईलवर काढले होत. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी सुरु केली होती. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. याच शारीरिक संबंधातून तिला ख्वाजाकडून एक मुलगी झाली होती. या मुलीवरुन त्यांच्यात नंतर खटके उडू लागले. प्रत्येक वेळेस तो तिला तिच्या अश्‍लील फोटोवरून ब्लॅकमेल करीत होता. त्यातून गेल्या काही महिन्यांपासून तो तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार करीत होता. त्याच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून तिने हा प्रकार तिच्या पतीला सांगितला. त्यानंतर या दोघांनी बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन ख्वाजा शेखविरुद्ध तक्रार केली होती.

Back to top button