Sanjay Pandey ED Summon : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना 'ईडी'चे समन्स, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी मंगळवारी हाेणार चाैकशी | पुढारी

Sanjay Pandey ED Summon : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना 'ईडी'चे समन्स, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी मंगळवारी हाेणार चाैकशी

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्‍या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांना रविवारी समन्स बजावली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, त्यांना ५ जुलै रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे ३ दिवसांपूर्वीच निवृत्त झाले आहेत. ( Sanjay Pandey ED Summon)

Sanjay Pandey ED Summon : काय आहे प्रकरण?

ईडीने (ED) एनएसईचा (NSE) सर्व्हर मधील फेरफार प्रकरणी त्यांना हे समन्स बजावले आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, चित्रा रामकृष्ण प्रकरणात एक कंपनी स्थापन करण्यात आली होती. ही कंपनी संजय पांडे यांच्या मालकीची होती. या दोन्ही प्रकरणात ईडीने त्याला नोटीस पाठवली असून चौकशीसाठी बोलावले आहे.

हेही वाचा

Back to top button