मुंबई पावसाचा जोर ओसरला, पण रिप रिप सुरूच | पुढारी

मुंबई पावसाचा जोर ओसरला, पण रिप रिप सुरूच

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईकरांना गुरुवारी झोडपून काढणार्‍या पावसाचा जोर आता ओसरला आहे. पण दिवसभर पावसाची रिप रिप सुरूच होती. अधून मधून पडणार्‍या जोरदार सरींमुळे हिंदमातासह सायन रोड नंबर 24, चेंबूर फाटक, सुंदरबाग, कमानी व अन्य भागात पाणी तुंबले होते.

मुंबई गुरुवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहराचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. मध्य व पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा पूर्णपणे कोलमडल्यामुळे चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले. शुक्रवारी मात्र पावसाचा जोर उतरला पण अधून मधून पडणार्‍या पावसाच्या जोरदार सरीमुळे रस्त्यावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. आजही मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

शहरातील काळबादेवी रोड, महर्षी कर्वे रोड, मोहम्मद अली रोड, डी. एन. रोड, नरिमन पॉईंट परिसर, धारावी, सायन आदी भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. पश्चिम उपनगरातील एस. व्ही. रोडसह लिंक रोड, पश्चिम द्रुतगती महामार्गावार वाहतुकीची कोंडी होती. पूर्व उपनगरातील एलबीएस मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती.

मध्य व पश्चिम रेल्वेची उपनगरीय गाड्या मात्र वेळापत्रकानुसार सुरू होत्या. पश्चिम उपनगरातही सरोदा पाडा, वीरा देसाई रोड आधी भागात पाणी तुंबले होते. चार ठिकाणी घर पडल्याच्या किरकोळ तक्रारीसह 23 ठिकाणी झाड व झाडाच्या फांद्या पडल्या. दोन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्याचे पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आले.

पावसाची नोंद

  • शहर 46 मिमी,
  • पूर्व उपनगर 55 मिमी
  • पश्चिम उपनगर 60 मिमी

Back to top button