‘जिओ’ची कमान आकाश अंबानी यांच्याकडे | पुढारी

‘जिओ’ची कमान आकाश अंबानी यांच्याकडे

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यावसायिकांत एक असलेले मुकेश अंबानी यांनी आपले साम्राज्य पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायंस जियो इन्फोकॉम लिमिटेडच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, संचालक मंडळाने तो स्वीकारला आहे.

मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी यांची आता अध्यक्षपदी नियुक्‍ती झाली आहे. मुकेश अंबानी हे जिओ प्लेटफॉर्मचे अध्यक्ष असतील. पंकज मोहन पवार हे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर असतील. अतिरिक्‍त संचालक म्हणून रामिंदर सिंह गुजराल आणि के. व्ही. चौधरी यांची निवड झाली आहे. आकाश हे अर्थशास्त्राचे पदवीधर आहेत. 2019 मध्ये त्यांनी श्‍लोका मेहता यांच्याशी विवाह केला. इशा आणि अनंत ही त्यांची भावंडे आहेत.

Back to top button