मुंबई : फडणवीस दिल्लीत सक्रिय होण्याची शक्यता | पुढारी

मुंबई : फडणवीस दिल्लीत सक्रिय होण्याची शक्यता

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या बंडाने राज्यात राजकीय भूकंप झाला असताना शांत असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आता सक्रिय होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी आपण भाजपच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट संकेत दिले असून देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी दिल्लीत पक्ष नेतृत्वाशी चर्चा करण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना अधिक वेग येणार आहे.

गेले दोन-तीन दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असणारे फडणवीस गुरुवारी सायंकाळी दिल्लीला रवाना झाले. एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेसह अपक्ष 42 आमदार सध्या गुवाहाटीत आहेत. ते सगळ्यांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे पाठविण्याची शक्यता आहे. यापूर्वी अजित पवार यांनी बंड करून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र हे बंड फसले. त्याची टीका अजूनही भाजपला सहन करावी लागत आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बंडात भाजप सावध पावले टाकत आहे.

हेही वाचा :

 

Back to top button