अजित पवारांकडून भाजपला क्लिनचीट, म्हणाले; ‘सरकार पाडण्यात त्यांचा हात..’ | पुढारी

अजित पवारांकडून भाजपला क्लिनचीट, म्हणाले; ‘सरकार पाडण्यात त्यांचा हात..’

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्याच्या महारास्ट्रातील राजकीय उलथापलथीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा खुलासा केली. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असून सरकार ठिकण्यासाठी आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या निधी वाटपाच्या आरोपांवर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. निधी वाटपामध्ये कसही दूजाभाव केला नसल्याचे त्यांनी सांगितले. माध्यमांसमोर बोलण्यापेक्षा माझ्याशी थेट बोलायला हवे. मी कधीही कुठल्याही आमदाराला कमी निधी दिला नाही. अडीच वर्षात निधीच्या बाबतीत कसलीच काटछाट केली नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

संजय राऊत यांचे शिवसेना मविआमधून बाहेर पडण्याबाबतचे विधान ऐकले. त्यांना बोलण्याचा हक्क आहे. पण राऊत काय बोलले तसं मुख्यमंत्री ठाकरेंच्या मनात आहे का याबाबत विचारणा नक्कीच करू. सरकार टीकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे. दरम्यान, सरकार पाडण्यात भाजपचा हात आहे का? असा सवाल विचारला असता त्यांनी याला स्पष्ट नकार दिला. भाजपचा कोणताही मोठा नेता काही करतोय असं दिसत नाही, असे सांगत त्यांनी भाजपलाच क्लिनचीट दिली.

शिवसेनेचे काही आमदार रुसले

शिवसेनेचे काही आमदार रुसले आहेत. अशा बंडखोरांचा रुसवाफुगवा निघाला की उद्या परत येतील. पण त्यांच्या बंडखोरीमध्ये भाजपचा हात आहे हे जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत मी यावर काही बोलणार नाही, असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडले. महाराष्ट्रातील राजकीय घडमोडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर ते माध्यमांसमोर बोलत होते.

Back to top button