मुंबई : राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट | पुढारी

मुंबई : राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर लवकरच चित्रपट

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड भव्य चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. याची घोषणा आव्हाड यांनी केली आहे. शाहू छत्रपती असे या चित्रपटाचे नाव असून युवा दिग्दर्शक
वरूण सुखराज या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. ‘शाहू छत्रपती’ चित्रपटाची कथा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अनेक दशकांच्या संशोधनावर आधारित आहे.

विद्रोह फिल्म्स या चित्रनिर्मिती संस्थेतर्फे या भव्य चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. यंदाचे राजर्षी शाहू महाराज यांचे स्मृतिशताब्दी वर्ष आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा गौरवशाली इतिहास लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट मराठीसह अन्य भाषांमध्येही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Back to top button