मुंबईत १९ वर्षांच्या विवाहितेवर एका नातेवाईकासह चौघांनी केला बलात्कार | पुढारी

मुंबईत १९ वर्षांच्या विवाहितेवर एका नातेवाईकासह चौघांनी केला बलात्कार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  कोलकत्ता येथून मुंबईमध्ये नोकरीसाठी आलेल्या एका 19 वर्षांच्या विवाहितेवर एका नातेवाईकासह चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कुर्ल्यामध्ये घडली आहे. याप्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या चौघांना बुधवारी स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिला ही कोलकत्ता येथील रहिवाशी असून मार्च महिन्यात तिच्या एका नातेवाईकाने तिला मुंबईमध्ये नोकरीसाठी आणले होते. मुंबईत आल्यानंतर ती तिच्या गोवंडी, शिवाजीनगर परिसरातील नातेवाईकांच्या घरी राहत होती. मार्च महिन्यांत नातेवाईक तिला घेऊन कुर्ला येथे आला होता. तिथेच त्याच्या परिचित तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हा प्रकार कोणालाही सांगू नये म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली होती.

नराधमांच्या तावडीतून अखेर या महिलेने स्वत:ची सुटका करुन घेत शिवाजीनगर पोलीस ठाणे  गाठले. तेथील पोलिसांना तिने घडलेला प्रकार सांगितला. मात्र तिच्यावर सामूहिक बलात्कार हा कुर्ला परिसरात झाल्याने पोलिसांनी तिला नेहरुनगर पोलीस ठाण्यात नेले. नेहरू नगर पोलिसांनी तिची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करून चारही आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून अटक केली आहे.

 

Back to top button