‘बेस्ट’ उपक्रमाचे जाहिरात हक्कांचे कंत्राट वादाच्या भोवऱ्यात | पुढारी

‘बेस्ट’ उपक्रमाचे जाहिरात हक्कांचे कंत्राट वादाच्या भोवऱ्यात

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : बेस्टमधील जाहिरात हक्कांसाठी निवड केलेल्या कंत्राटदाराने कोणतीही थकीत बिले ठेवू नये, अशी प्रमुख अट असते. तरीही बेस्ट उपक्रमाने मासिक भाड्यातील ३० कोटी रुपयांची रक्कम थकीत असलेल्या कंपनीला कंत्राट दिले आहे, असा आरोप मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

बेस्ट उपक्रमाने तीन वर्षांचे जाहिरात हक्क देण्यासाठी निविदा मागितल्या होत्या. निविदा प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या कंत्राटदाराची बिले प्रलंबित किंवा थकीत नसावीत अशी प्रमुख अट असते. परंतु संबंधित कंपनी गेल्या तीन वर्षांपासून बेस्ट संदर्भातील जाहिरात हक्कांचे कंत्राट चालवत होती. तेव्हा या कंपनीने ३० कोटी एवढी मासिक भाड्याची रक्कम थकीत ठेवली असताना पुन्हा त्याच कंपनीला कंत्राट दिल्याचा मुद्दा रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.

बेस्ट उपक्रम आर्थिक संकटाचा सामना करत असूनही संबंधित कंपनीसाठी पक्षपात केला जात असल्याचे रवी राजा यांचे म्हणणे आहे. ही प्रक्रिया रोखण्यासाठी वेळ पडल्यास न्यायालयात दाद मागणार असेही त्यांनी जाहीर केले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button