Shiv Sena Rajya Sabha : सेनेच्या संजय राऊत, संजय पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल | पुढारी

Shiv Sena Rajya Sabha : सेनेच्या संजय राऊत, संजय पवार यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यसभेच्या दोन जागांवर आज शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. शिवसेना नेते संजय राऊत आणि संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेच्या ऑफरला प्रतिसाद न दिल्याने अखेर शिवसेनेने कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना सहाव्या जागेवर उमेदवारी दिली. त्यामुळे यापुढे राज्यातील राजकारणात पुढे कोणत्या घडामोडी होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. shiv sena rajya sabha : शिवसेनेच्या संजय राऊत, संजय पवारांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल

अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मी स्वत: आणि कोल्हापुरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मी खात्रीने सांगू शकतो की, या वेळी शिवसेनेचे दोन्ही उमेदवार राज्यसभेवर जातील यात शंका नाही. अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते, अशी त्यांनी माहिती दिली.

shiv sena rajya sabha : शिवसेनेच्या संजय राऊत, संजय पवारांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखलदरम्यान, काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर कपिल सिब्बल यांनी समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यानं राज्यसभेसाठी काल अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार नसल्याचं लक्षात आल्यानंतर सिब्बल यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

Back to top button