इंडेन एलपीजी कनेक्शन मिळवा फक्त एका मिस कॉलवर

इंडेन एलपीजी कनेक्शन मिळवा फक्त एका मिस कॉलवर
Published on
Updated on

इंडियन ऑईलने सर्व ग्राहकांसाठी इंडेन एलपीजी कनेक्शन मिळवण्यासाठी मिस कॉल सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सध्याच्या ग्राहकांना सिलिंडर मागवण्यासाठी देखील नोंदणीकृत फोन क्रमांकावरून मिस्ड कॉल देऊन मागणी नोंदवता येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या दृष्टीकोनाला अनुसरून इंडियन ऑईलने सर्व ग्राहकांसाठी मिस्ड कॉल सुविधा उपलब्ध करून दिली आहे. देशभरातील संभाव्य ग्राहक नवीन इंडेन एलपीजी जोडणी घेण्यासाठी आता 8454955555 या नंबरवर मिस कॉल देऊ शकतात.

'व्यापक स्तरावर ग्राहक संपर्क असणाऱ्या इंडियन ऑईलचा प्रयत्न अजून संपर्क वाढवण्यासाठी आहे.' असे इंडियन ऑइलचे अध्यक्ष एस. एम. वैद्य यांनी देशभरातील ग्राहकांसाठी या सुविधेचा प्रारंभ करताना सांगितले.

ग्राहकांना सोप्या पद्धतीने मिळणार इंडेन एलपीजी

'अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आम्ही आमच्या ग्राहकांना सातत्याने नवनवीन सुविधा देत असतो. ग्राहकांना इंडेन एलपीजी त्वरित आणि सोप्या पद्धतीने उपलब्ध होण्यासंदर्भात ही मिस कॉल सुविधा योग्य भूमिका बजावेल.

तसेच ग्राहकांच्या समाधानास पात्र ठरेल याची मला मला संपूर्ण खात्री आहे.' असेही वैद्य यांनी नमूद केले.

ग्राहकांना एलपीजीचा रिफिल सिलिंडर मागवण्यासाठी किंवा एलपीजीच्या किमतीचा भरणा करण्यासाठी भारत बिल पेमेंट सिस्टीम, इंडियन ऑइल वन ॲप किंवा https://cx.indianoil.in पोर्टलचा वापर करता येईल.

एलपीजी रिफिल सिलिंडर नोंदवणे तसेच रिफिलसाठी किमतीचा भरणा करणे या दोन्ही गोष्टी 7588888824 या नंबर वरून व्हाट्सअप करुन किंवा 7718955555 या नंबरवर एसएमएस /आयव्हीआरएस माध्यमातून करू शकतील शकतात.

याशिवाय ॲमेझॉनचे अलेक्सा किंवा पेटीएम चॅनेल्सवरूनही ही कामे करता येतील.

रिफिलसाठीही उपयुक्त

'रिफिल नोंदवण्यासाठी देशभरातून कुठूनही मिस कॉल देण्याची सुविधा आणि निवडक ठिकाणी नवीन जोडणीसाठी मिस कॉल सुविधा जानेवारी २०२१ मध्ये सुरू केली होती.

वापरास सुलभ असणारी मिस कॉल सुविधा ग्राहकांचा वेळ वाचवेल. तसेच नवीन ग्राहकांना जोडणीसाठी असलेली मिस कॉलची सुविधा ही सोपी व विनाखर्चाची असल्याने ग्राहकांना विशेषतः वरिष्ठ नागरिक आणि ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी ती जास्त उपयुक्त ठरेल.' अशी अपेक्षा अध्यक्षांनी व्यक्त केली.

डबल बॉटल कनेक्शन (DBC) ही आणखी एक सुविधा ग्राहकांना घरपोच देण्याच्या उपक्रमाचेही एस. एम. वैद्य यांनी यावेळी उद्घाटन केले.

या योजनेअंतर्गत सिलिंडर देणारा कर्मचारी, सध्याचे एक सिलिंडर हे डबल बॉटल कनेक्शन म्हणजे दोन सिलिंडरमध्ये परावर्तित करण्याची सुविधा घरपोच देऊ शकेल.

यामध्ये सामान्यतः १४.२ किलोग्रॅम एवढ्या सिलिंडरबरोबर पाच किलोग्रामचा सिलिंडर मिळेल.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : कुठवर मी शेजारच्या बाईच्या घरात रहायची?

https://youtu.be/0VlWC-ml5YM

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news