स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर, नोव्हेबरमध्येच! | पुढारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर, नोव्हेबरमध्येच!

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पावसाळ्यानंतरच म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये होण्याचे संकेत राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी दिले.

मुंबई आणि कोकण विभागातील निवडणुका या पावसाळ्यानंतर घ्याव्यात, तर अन्यत्र पावसाळ्यात निवडणूक घेता येणे शक्य असेल तर त्यादृष्टीने कार्यक्रम ठरवावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. मात्र अशा प्रकारे निवडणुका घेताना हवामान खाते आणि स्थानिक प्रशासन यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागणार असून जून, जुलै महिन्यात निवडणूकपूर्व कामे झाल्यानंतर हवामान खाते, स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेशी चर्चा करून निवडणूक कार्यक्रम निश्चित करू,असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी सांगितले.

मतदारयाद्यांचे प्रभागनिहाय विभाजन तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला आरक्षण काढण्याची निवडणूकपूर्व प्रक्रिया जुलैअखेरपर्यंत पूर्ण होऊ शकते. महानगरपालिकांचे निवडणूकपूर्व काम जूनअखेरपर्यंत, तर जिल्हा परिषदा आणि नगर पंचायती आणि नगर परिषदा यांची निवडणूक प्रक्रिया जुलै अखेरपर्यंत संपणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करता येणे शक्य नाही, याकडेही मदान यांनी लक्ष वेधले.

राज्यातील 14 महापालिका, 25 जिल्हा परिषद, 284 पंचायत समित्या आणि 220 नगरपालिका आणि नगर पंचायती यांच्या मुदत संपल्याने त्यांच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत.

निवडणूक होऊ घातलेल्या महापालिका

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, अकोला,सोलापूर आणि नाशिक

निवडणूक होऊ घातलेल्या जिल्हा परिषदा

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, अकोला,सोलापूर आणि नाशिक

Back to top button