केतकी चितळे हिच्यावर फेकले शाई-अंडी; राष्ट्रवादी युवती संघटनेचे आंदोलन - पुढारी

केतकी चितळे हिच्यावर फेकले शाई-अंडी; राष्ट्रवादी युवती संघटनेचे आंदोलन

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अभिनेत्री केतकी चितळेने केलेल्या वादग्रस्त पोस्ट नंतर अवघ्या महाराष्ट्रात केतकीचा निषेध केला जात आहे. या प्रकरणी अनेक ठिकाणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी मुंबईतील कळंबोली पोलिसांकडून तिची चुकशी करण्यासाठी तिला ताब्या घेण्यात आले होते. यावेळी केतकी चितळेला बंदोबस्तात घेऊन जात असताना तिच्यावर शाई व अंडी फेकण्यात आले. राष्ट्रवादीच्या युवती सेल कडून केतकीवर अंडी व शाई फेकून आंदोलन करण्यात आले.

कळंबोली पोलिस ठाण्यात वादग्रस्त पोस्ट प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या चौकशी नंतर तिला पोलिस बंदोबस्तात घेऊन जात असताना पोलिस ठाण्याच्या बाहेर केतकी चितळेवर शाई व अंडी फेकण्यात येऊन केतकीचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या युवती संघटनेच्या वतीने राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केतकी चितळेवर शाई आणि अंडी फेकून तिने केलेल्या कृत्यबद्दल तिला चांगलाच प्रसाद दिला असल्याचे सांगितले. केतकी चितळे या अभिनेत्रीने शुक्रवारी फेसबुकवर एक कविता पोस्ट केली होती. या कवितेमध्ये तीने जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या शद्बात टीका केली होती. या सर्व प्रकरणावर अनेकांच्या प्रतिक्रीया उमटत आहेत. तसेच केतकी चितळे हिचा निषेध नोंदवला जात आहे.

Back to top button