

मुंबई : बोरिवली येथील देवीपाडा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील 883 झोपडीधारकांना दिवाळीच्या मुहूर्तावर खास भेट मिळाली आहे. 17 कोटी 66 लाख रुपये थकीत भाड्याचे वितरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन योजनांचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. इमारतींचे बांधकाम थांबलेले असताना येथील रहिवासी इतरत्र भाड्याने राहात असतात. अशा वेळी विकासकाने त्यांना भाड्याची रक्कम देणे अपेक्षित असते. तसा करारही झालेला असतो. मात्र बऱ्याचदा विकासक भाड्याचे रक्कम देणे टाळतात. त्यामुळे रहिवाशांना आर्थिक ताण सोसावा लागतो.
देवीपाडा झोपु प्रकल्पातील विकासकाने 17 कोटी 66 लाख रुपये भाडे थकवले होते. या प्रकल्पात 883 झोपडीधारक असून त्यांनी झोपु प्राधिकरणाकडे पाठपुरावा केल्यानंतर विकासकाकडून वसुली करण्यात आली. यानंतर प्रत्येक झोपडीधारकाला 2 लाख रुपये याप्रमाणे 17 कोटी 66 लाख रुपये थकीत भाड्याचे वितरण करण्यात आले.