गौतम अदानी यांच्यावर गुन्हा दाखल करा; काेणी केली मागणी | पुढारी

गौतम अदानी यांच्यावर गुन्हा दाखल करा; काेणी केली मागणी

मुंबई; पुढारी वृत्‍तसेवा : गौतम अदानी : मुंबई विमानतळावर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आला. असा नामफलक लावून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या गौतम अदानी आणि संबंधित अधिकारी वर्गावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस आयुक्तांकडे गलगली यांनी या विषयी तक्रार केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विलेपार्ले पोलीसांसहित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त यांना पाठविलेल्या ईमेलद्वारे तक्रारीत नमूद केले आहे.

त्‍यानुसार मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा १३ जुलैला अदानींकडे देण्यात आला आहे.

यानंतर मुंबई विमानतळावर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत.

हे नामफलक जरी तोडले गेले असले तरी असे नामफलक लावत अदानी कंपनी कडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करण्यात आलेला आहे, असे गलगली यांनी आपल्‍या तक्ररीत म्‍हटले आहे.

गौतम अदानी तसेच अन्य संबंधित अधिकारी वर्गावर कारवाई होणे आवश्यक आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अधिकृत नाव असताना अदानी विमानतळ असे नामफलक लावत अदानी कंपनीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे, ही बाब सिद्ध झाली आहे.

गौतम अदानी तसेच अन्य संबंधित अधिकारी वर्गावर धार्मिक श्रद्धेचा अपमान केल्याबद्दल/ एका वर्गाला अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल दूरभावनपूर्ण कृती अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणी गलगली यांची आहे.

Back to top button