

मुंबई : सतरा वर्षीय मुलाला सोळा वर्षीय मित्राने चाकूने भोसकल्याची घटना मानखुर्द परिसरात घडली. या हल्ल्यात साहिल हा गंभीर जखमी झाल्याने त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्यानंतर पळून गेलेल्या आरोपी मुलाला मानखुर्द पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविले आहे. त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 16 ऑक्टोबरला सकाळी साडेसहा वाजता मानखुर्द येथील अण्णाभाऊ साठेनगर, सागर चाळीत घडली. दोन दिवसांपूर्वी त्यांच्यात एका क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. त्याच रागातून आरोपीने साहिलच्या गळ्यात चाकूने भोसकले होते.