यंदाच्या उन्हाळ्यात मुंबईत विजेचा वापर १० टक्क्यांहून अधिक | पुढारी

यंदाच्या उन्हाळ्यात मुंबईत विजेचा वापर १० टक्क्यांहून अधिक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईसह भारताच्या अनेक भागांमध्ये आपण अभूतपूर्व उष्णतेच्या लाटा अनुभवत आहोत. परिणामी, यंदाच्या मार्च आणि एप्रिलमध्येच तापमानात प्रचंड वाढ होत असल्याचे स्पष्ट होते. यामुळे निवासी, औद्योगिक किंवा व्यावसायिक अशा सर्व गटातील ग्राहकांकडून विजेच्या मागणीत वाढ नोंदवली जात आहे.

असेच चित्र हे ट्रेंड येणा-या मे आणि जूनमध्ये दिसण्याची किंबहुना अधिक गडद होण्याची शक्यता आहे. IPCC (वातावरणीय बदलाबाबतचा आंतर-सरकारी गट) ने, ३५ डिग्री सेल्सिअसहून अधिक तापमान असलेल्या दिवसांची संख्या नजीकच्या भविष्यात २० ते ३० दिवसांनी वाढू शकते. तसेच अधिक उत्सर्जन आणि ग्लोबल वॉर्मिंग स्थितीत ती ४० दिवसांपर्यंतही झेपावू शकते. [स्रोत : TOI अहवाल दिनांक १६ मार्च २०२२] असा अंदाज व्यक्त केला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, २० एप्रिल रोजी ४२.६ डिग्री सेल्सिअस असे दिवसातील गेल्या पाच वर्षातील सर्वात उष्ण तापमान नोंदविले गेले. परिणामी, वीज आणि कोळशाची मागणी वेगाने वाढली. मार्चमध्ये राष्ट्रीय सरासरी कमाल तापमान जवळपास ३३.२ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले. ते १९०१ पासून याबाबतची माहिती संकलित करणे सुरू केल्यापासूनचे विक्रमी तापमान आहे. [स्रोत : HT अहवाल दिनांक २६ एप्रिल २०२२]

वाढत्या मागणीचा ग्राहकांवर परिणाम

१) MERC द्वारे अनिवार्य केलेल्या वाढीव टॅरिफ स्लॅब आणि टेलिस्कोपिक दरांकडे ग्राहक वळू शकतात.

२) बिगर उन्हाळी महिन्यांच्या तुलनेत विजेचा वापर लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे.

३) देशांतर्गत कोळशाची टंचाई, आयात कोळसा आणि कच्च्या तेलाची वाढलेली किंमती यामुळे वीज खरेदी खर्च वाढला आहे. याचा परिणाम, येत्या काही महिन्यांत FAC अंतर्गत लागू होणा-या वीज दरांवर परिणाम होऊ शकतो.

४) ग्राहकांकडून विजेचा वापर वाढल्याने त्यांचे देयक (बिल) वाढण्याची शक्यता आहे. गारव्यासाठी मुंबईकरांकडून अधिक प्रमाणात वातानुकूलित उपकरणांचा वापर होण्याचा प्रयत्न होत असल्याने परिणामी विजेचा वापरही वाढत आहे.

५) ग्राहक ५ तारांकित (५ star) मानांकन असलेली उपकरणे वापरू शकतात. अधिक थंडाव्यासाठी एसी सुरू असताना पंखेही वापरू शकतात. वातानुकूलित (एसी) उपकरणांचे तापमान २४ अंशांवर स्थिर ठेवू शकतात. तसेच विजेचा समतोल वापर होण्यासाठी इतर अनेक उपायही योजू शकतात.

Back to top button