पीयूसीचे दर कडाडले; तब्बल 50% वाढ | पुढारी

पीयूसीचे दर कडाडले; तब्बल 50% वाढ

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : वाहनांची वायू प्रदूषण तपासणी करून वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) जारी करणार्‍या केंद्रांना चाचणी शुल्कात तब्बल 50 टक्क्यांनी वाढ करण्यास परिवहन विभागाने मंजुरी दिली आहे. आधीच इंधन दरवाढीने होरपळलेल्या वाहनचालकांना आता पीयूसी दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत.

दुचाकी वाहनांना आता पीयूसीसाठी 35 रुपयांऐवजी 50 रुपये तर पेट्रोलवर धावणार्‍या तीनचाकी वाहनांना 70 रुपयांऐवजी 100 रुपये खर्च करावे लागतील.

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीवर चालणार्‍या चारचाकी वाहनांना 90 रुपयांऐवजी 125, डिझेलवर धावणार्‍या वाहनांना 110 रुपयांऐवजी 150 रुपये आकारले जातील. सुधारित दरवाढ 25 एप्रिलपासून लागू करताना पीयूसी केंद्रांकडून या दरवाढीची अंमलबजावणी होते की नाही, हे तपासण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत.

Back to top button