झेड सिक्युरिटी नसती तर सोमय्यांची हत्या झाली असती : प्रवीण दरेकर | पुढारी

झेड सिक्युरिटी नसती तर सोमय्यांची हत्या झाली असती : प्रवीण दरेकर

 पुढारी ऑनलाईन डेस्क : झेड सिक्युरिटी नसती तर भाजप नेते किरीट सोमय्या यांची हत्या झाली असती, असा आराेप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. साेमय्‍यांवर झालेल्‍या हल्‍लाप्रकरणी भाजपच्‍या शिष्टमंडळाने आज राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवदेन दिले. यानंतर ते माध्‍यमांशी बाेलत हाेते.

या वेळी दरेकर  म्हणाले, सोमय्यांवर हल्‍ला झाला त्‍यावेळी राज्‍य सरकारने बघ्याची भूमिका घेतली. या सगळ्या घटना लोकशाहीला घातक आहेत. राज्‍यात सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसं, असा सवालही त्‍यांनी केला. राज्‍य सरकारच्या दबावाखाली पोलिस काम करत आहेत. केद्राच्या सुरक्षितेवर प्रश्न उपस्थित करणे  चुकीचं आहे, असेही ते म्‍हणाले.

या वेळी  भाजप नेते  किरीट सोमय्या म्‍हणाले, आज भाजप शिष्टमंडळाने राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सांताक्रुझ पाेलीस ठाण्‍यात दाखल करण्‍यात आलेला बाेगस एफआयआर मागे घ्यावा. या प्रकरणी  पोलिस आयुक्तांवर कारवाई करावी, अशीही मागणी राज्यपालांकडे केली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button