धक्कादायक! परळ डेपोजवळ कागल आगारच्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू | पुढारी

धक्कादायक! परळ डेपोजवळ कागल आगारच्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मागील सहा महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रभर आंदोलन सुरू होते. कुठल्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता, त्यांना निवृत्तीवेतन, ग्रॅच्युईटी देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिले. हायकोर्टाच्या या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात आनंदोत्सवही साजरा केला, पण दोन दिवसानंतर लगेचच त्यांनी शरद पवार यांच्या घरावर हल्ला करत, आंदोलन केले. यानंतर काही एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर काही तिथेच ठिय्या मारून बसले. दरम्यान, परळ (मुंबई) आगारापासून १०० मीटर अंतरावर सारथी बीयर बारच्या जवळ शुक्रवारी (दि.०८) सायंकाळी ८ वाजता एक अज्ञात इसम दारू पिऊन पडला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. या अज्ञात इसमाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांने स्पष्ट केले आहे.

सदर इसम चार दिवसापासून सारथी बीयर बारच्या आसपास दारू पिऊन पडलेल्या स्थितीत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्या ठिकाणी तपास केला असता सदर इसमाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर अधिक तपास करण्यास पोलिसांनी सुरूवात केली. यानंतर पोलिसांनी परळ आगारातील ड्युटी इनचार्ज साबळे यांच्याकडे चौकशी केली. यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर एसटी कर्मचारी परळ आगारातील नसल्याने दिसून आले. नंतर पोलिसांनी इचलकरंजी आगराचा भ्रमणध्वनी क्रमांक मागूण घेत, सदर इसमाची चौकशी केली.

यानंतर आज (दि.०९) पोलिसांनी दादर पोलीस स्टेशन येथे अधिक चौकशी केली असता, सदर इसम एसटीच्या कागल आगाराचे वाहक असल्याचे समजले. सदर इसमाचे नाव महेश सुरेश लोले असे आहे. त्याचा मृत्यू झाल्याने सदर इसमाचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी सायन रुग्णालयात नेण्यात आला आहे, तसेच कुटुंबीयांचे सांत्वन, आर्थिक मदत इत्यादी बाबत पुढील कार्यवाही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचलत का ?

 

Back to top button