राज कुंद्रा प्रकरणात चर्चेत असलेली कामसूत्र फेम शर्लिन चोप्रा कशी आली पॉर्न इंडस्ट्रीत?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज कुंद्राला पॉर्नोग्राफी केस प्रकरणी अटक झाल्यानंतर सर्वांधिक चर्चेत आली ती म्हणजे शर्लिन चोप्रा. पोर्नोग्राफी केस प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी नुकतेच शर्लिन चोप्रा हिला समन्स पाठवले आहे.

लंडनच्या ‘हॉटशॉट’ अ‍ॅपला पॉर्न फिल्म तयार करून विकल्याच्या आरोपाखाली सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला अटक झाली. सध्या राज कुंद्रा न्यायालयीन कोठडीत आहे.

पोर्नोग्राफी केस प्रकरणी राज कुंद्राच्या अटकेनंतर आता मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोप्राची देखील चौकशी होणार आहे.

शर्लिन चोप्राने हल्लीच राज कुंद्रा आणि पॉर्न केस संदर्भात मोठा खुलासा केला होता. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात तिने म्हटले आहे की या केस संदर्भात आपण पहिल्यांदा पोलिसांकडे साक्ष नोंदवली होती.

शर्लिन चोप्राला प्रत्येक प्रोजेक्टसाठी ३० लाख रुपयांचे पैसे दिले जायचे. शर्लिनच्या म्हणण्यानुसार तिने असे १५ ते २० प्रोजेक्ट केले आहेत.

एडल्ट फिल्म इंडस्ट्रीत आणण्यास राज कुंद्रा कारणीभूत असल्याचा आरोप शर्लिन चोप्राने याआधी केला आहे. शर्लिन सोबतच पूनम पांडे हिने राज कुंद्रा सोबत फिल्मसाठी करार केले होते.

शर्लिनने राज कुंद्राच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. त्यासाठी तिला मोठी रक्कमही देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

शर्लिनचे अनेक धक्कादायक खुलासे…

शर्लिन चोप्राचा जन्म ११ फेब्रुवारी १९८४ मध्ये हैदराबादमध्ये झाला. शर्लिन बोल्ड सीन शिवाय बॉलिवूडमध्ये फार काही साध्य करु शकली नाही. पण तिने पॉर्न इंडस्ट्री आणि राज कुंद्रा याच्याबाबत केलेले खुलासे धक्कादायक आहेत.

शर्लिनने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात २००५ मध्ये रिलीज झालेल्या ‘टाइमपास’मधून केली. याशिवाय शर्लिनने डायरेक्टर रुपेश पॉल याचा इंग्रजी चित्रपट ‘कामसूत्र ३ डी’मध्ये काम केले आहे.

प्ले बॉय मॅगझिनसाठी दिली होती न्यूड पोझ…

शर्लिन चित्रपटांत येण्यापूर्वी मॉडेलिंग करत होती. शर्लिन चोप्राने अनेक हिंदी, तेलुगू, तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

शर्लिन २०१२ मध्ये सर्वांधिक चर्चेत आली; ती म्हणजे तिने दिलेल्या न्यूड फोटो पोझमुळे. तिने जुलै २०१२ मध्ये प्ले बॉय मॅगझिनसाठी न्यूड पोझ दिली होती. प्ले बॉय मॅगझिनसाठी न्यूड पोझ देणारी ती पहिली भारतीय महिला आहे. तिचा हा फोटो दोन वर्षांनंतर रिलीज करण्यात आला.

त्यानंतर एमटीव्ही स्पिट्सव्हिलाचा सहावा सीझन होस्ट करण्याची तिला संधी मिळाली.

बोल्डनेसमुळे चर्चेत…

शर्लिन नेहमीच बोल्ड फोटोज आणि कमेंट्सवरुन नेहमीच चर्चेत राहिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती चित्रपटात दिसून आली नाही. शर्लिन बिग बॉस सीझन ३ मध्ये दिसली होती.

हे ही वाचा :

Back to top button