ऐश्वर्या राय बच्चन दुसऱ्यांदा प्रेग्नंट? फोटो केले शेअर | पुढारी

ऐश्वर्या राय बच्चन दुसऱ्यांदा प्रेग्नंट? फोटो केले शेअर

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिचे काही हल्लीचे फोटो समोर आले आहेत. तिचे हे फोटो पाहून ऐश्वर्या राय प्रेग्नंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. या फोटोंत ऐश्वर्या आपल्या कुटुंबियांसमवेत दिसून आली आहे. तसेच तिच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री वारालक्ष्मी सरथकुमार देखील दिसत आहे.

वारालक्ष्मीने ऐश्वर्या सोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून काही चाहते ऐश्वर्या दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचा कयास बांधत आहेत.

सोशल मीडियावर चाहते विचारत आहेत की, ऐश्वर्या राय प्रेग्नंट आहे की काय?.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंत ऐश्वर्या ब्लॅक ड्रेसमध्ये दिसत आहे. ती मणिरत्नम यांच्या पेन्नियन सेल्वन चित्रपटातून वापसी करत आहे. या चित्रपटाचे शुटिंग सध्या पॉन्‍डिचेरीमध्ये सुरु आहे.

शुटिंगसाठी ऐश्वर्या सध्या पॉन्डिचेरीत आहे. या दरम्यान ऐश्वर्या को-स्टार सरथ कुमार आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेली होती.

ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याच्या अफवा याआधीही उठल्या होत्या.

हल्लीच सोनम कपूर विमानतळावर स्पॉट झाली होती. तिला पाहून ती प्रेग्नंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती.

मात्र, या अफवा असल्याचे सांगून सोनमने प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.

आता ऐश्वर्या राय पुन्हा चर्चेत आली आहे. तिने १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली.

जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये तुमची गणना केली जाते. तिच्या सौंदर्याचे चाहते जगभरात आहेत. बॉलिवूडमधील ती सर्वांत सुंदर अभिनेत्री आहे.

हे ही वाचा :

Back to top button