‘एमआयएम’ भाजपची बी टीम : जयंत पाटील | पुढारी

'एमआयएम' भाजपची बी टीम : जयंत पाटील

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : आगामी निवडणुकांमध्‍ये भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी ‘एमआयएम’ने दाखविल्याने राज्याच्या राजकारणात नव्या रंगांची उधणळण्याची शक्यता आहे. ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना तशी ऑफरच दिली आहे. यावर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

मंत्री पाटील म्हणाले की, भाजपला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. एमआयएम भाजपची बी टीम असू नये कशावरून? औरंगाबाद महापालिकेत या पक्षाचा रोल काय, एमआयएम पुरोगामी आहे का हे पहिल्यांदा पहावे लागेल. युपीच्या निवडणुकीत एमआयएमला ५ हजारच्यावर मते मिळाली जर एमआयएमने सपासोबत युती केली असती तर सध्या युपीतील चित्र वेगळे असते

देशात कोणत्याही ठिकाणी निवडणुका लढवायच्या हा ‘एमआयएम’चा अजेंडा आहे. इम्तियाज जल[ल यांच्या वागण्यावरून तरी सध्या एमआयएम भाजपची बी टीम म्हणून दिसत. एमआयएम महाविकास आघाडीत येण्यासाठी प्रस्ताव आल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण अद्याप असा कोणताही निर्णय झाला नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

हेही वाचलं का? 

Back to top button