डेप्युटी आरटीओ खरमाटेंची कोट्यवधींची मालमत्ता उघड | पुढारी

डेप्युटी आरटीओ खरमाटेंची कोट्यवधींची मालमत्ता उघड

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : दरमहा एक-सव्वा लाख पगार असलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (डेप्युटी आरटीओ) बजरंग खरमाटे यांनी गेल्या दहा वर्षांत अमाप संपत्ती जमवल्याचे आयकर खात्याच्या धाडींमध्ये उघड झाले आहे. ही संपत्ती खरेदी करण्यासाठी खरमाटे यांनी पैसा आणला कुठून? या प्रश्नाचे उत्तर आयकर खाते आता शोधू लागले आहे.

गेल्या 8 मार्च रोजी आयकर खात्याने राज्यभर 26 ठिकाणी धाडी टाकल्या. त्यात मुंबईतील एक केबल ऑपरेटर आणि परिवहनमंत्री अनिल परब यांचे विश्वासू सदानंद कदम तसेच वादग्रस्त डेप्युटी आरटीओ बजरंग खरमाटे यांच्याशी संबंधित मालमत्तांचा समावेश होता. या छाप्यांचा तपशील आता समोर येऊ लागला आहे. खरमाटे हे देखील परब यांचे निकटवर्तीय अधिकारी म्हणून ख्यातकीर्त असून, त्यांच्याविरुद्ध पहिली तक्रार नाशिकमधून दाखल झाली. या तक्रारीतही खरमाटे यांनी जमवलेल्या अमाप संपत्तीचे कनेक्शन परिवहनमंत्र्यांशी असल्याचे म्हटलेले होते.

खरमाटे यांनी इतकी प्रचंड मालमत्ता खरेदी करण्यासाठी कुठून पैसा आणला, याचा पान 2 वर
शोध आता आयकर खाते घेत आहे. उच्चस्तरीय सूत्रांनी ‘पुढारी’ला सांगितले की, बजरंग खरमाटे यांचे मूळ वेतन 60 हजार रुपये आहे. सर्व भत्ते मिळून त्यांचा दरमहा पगार एक ते सव्वा लाखाच्या पुढे जात नाही. असे असताना खरमाटे यांनी कोट्यवधींची मालमत्ता घेण्यासाठी पैसा कसा उभा केला, हा एकच प्रश्न आयकर तपासाचा केंद्रबिंदू झाला आहे.
शोध आता आयकर खाते घेत आहे. उच्चस्तरीय सूत्रांनी ‘पुढारी’ला सांगितले की, बजरंग खरमाटे यांचे मूळ वेतन 60 हजार रुपये आहे. सर्व भत्ते मिळून त्यांचा दरमहा पगार एक ते सव्वा लाखाच्या पुढे जात नाही. असे असताना खरमाटे यांनी कोट्यवधींची मालमत्ता घेण्यासाठी पैसा कसा उभा केला, हा एकच प्रश्न आयकर तपासाचा केंद्रबिंदू झाला आहे.

नवी मुंबईतही एक फ्लॅट

  • सांगली, बारामती आणि पुण्यात मोकळे भूखंड
  • पुण्याजवळ 7 वर्षांत 100 एकरहून अधिक शेतजमीन खरेदी.
  • खरमाटे यांनी बारामतीत एक जमीन विकली आणि या व्यवहारातून त्यांच्याकडे बेहिशेबी दोन कोटी रुपये आल्याचाही खुलासा आयकरच्या हाती लागला.
  • खरमाटे यांचा एक नातेवाईक बांधकाम उद्योगात असून, त्याच्या कंपनीला राज्य सरकारची अनेक कंत्राटे मिळाली. या कंत्राटांच्या रकमा बोगस खरेदी, बोगस सब कॉन्ट्रॅक्ट्स दाखवून 27 कोटींपर्यंत फुगवण्यात आल्याचेही आयकर छाप्यात दिसून आले.
  • बांधकाम व्यवसायातील करचुकवेगिरीबाबतही पुढील तपास सुरू आहे.

Back to top button