इंटरनेटविना आता फीचर फोनवरही करा यूपीआय पेमेंट

इंटरनेटविना आता फीचर फोनवरही करा यूपीआय पेमेंट
Published on
Updated on

मुंबई ; वृत्तसंस्था : इंटरनेटविना आता फीचर फोनद्वारेही यूपीआय पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांनी मंगळवारी यासाठी '123 पे' नावाने स्वतंत्र यूपीआय सादर केले आहे.

या डिजिटल पेमेंटसाठी 'डीजीसाथी' ही अहोरात्र चालणारी हेल्पलाईनदेखील सुरू केली आहे. 'यूपीआय 123 पे'च्या मदतीने वापरकर्ते फीचर फोनवरून हे पेमेंट करू शकतील.

स्कॅन आणि पे वगळता सर्वप्रकारचे व्यवहार याद्वारे केले जाऊ शकतात. यामुळे पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. ही सुविधा वापरण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांचा मोबाईल क्रमांक आणि बँक खाते संलग्‍न करावे लागेल.

यूपीआय पेमेंट प्लॅटफॉर्म 2016 मध्ये सुरू करण्यात आला. आतापर्यंत अशा पेमेंटसाठी स्मार्टफोन आवश्यक होता. त्यामुळे ग्रामीण भागात अनेकांना त्याचा वापर करता आला नाही. फीचर फोनसाठी यूपीआय सुविधा सुरू केल्यामुळे खेड्यांमध्ये डिजिटल पेमेंटचा वापर वाढेल, असा विश्‍वास बँकेला आहे.

फीचर फोनवरून डिजिटल पेमेंटची सुविधा देशात आधीच अस्तित्वात होती; पण ती 'यूएसएसडी'वर आधारित असल्यामुळे त्याचा फारसा वापर होत नव्हता. वापरकर्ते *99 कोड वापरून स्मार्टफोनशिवाय किंवा इंटरनेट कनेक्शनशिवाय मोबाईल बँकिंग सेवा वापरू शकतात.

फीचर फोन म्हणजे?

फीचर फोन म्हणजे बेसिक फोन. यात फक्‍त कॉल करणे, कॉल रिसीव्ह करणे आणि मेसेज पाठवणे आणि प्राप्‍त करणे ही सुविधा आहे. आजही लोकसंख्येचा मोठा भाग विशेषत: खेड्यापाड्यांत लोक फीचर फोन अधिक वापरतात.

या चार पर्यायांद्वारे व्यवहार…

* आयव्हीआर प्रणाली किंवा आवाज आधारित प्रणाली, ज्यामध्ये वापरकर्ते एनपीसीआयच्या नंबरवर कॉल करून सुरक्षित व्यवहार करू शकतात.

* स्कॅन आणि पे वगळता, सर्व व्यवहार या अ‍ॅप-आधारित चॅनेलद्वारे केले जातील, फीचर फोनमध्ये एक अ‍ॅप असेल. स्कॅन आणि पेमेंट वैशिष्ट्य वगळता सर्व व्यवहार स्मार्टफोनवरील यूपीआय अ‍ॅपवर दिले जातील. रिझर्व्ह बँक लवकरच स्कॅन आणि पे फीचर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.

* प्रॉक्सिमिटी ध्वनी आधारित पेमेंट. हा व्यवहार ध्वनी लहरी सक्षम संपर्क सक्षम करण्यासाठी आणि संपर्करहित पेमेंट करण्यासाठी असेल.

* मिस्ड कॉल आधारित प्रणालीत मिस्ड कॉल द्यावा लागेल त्यानंतर कॉल बॅक उपलब्ध होईल. वापरकर्ते यूपीआय पिन टाकून पेमेंट करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news