मुंबई : नवाब मलिक यांच्याविरोधात प्राथमिकद‍ृष्ट्या पुरावे उपलब्ध | पुढारी

मुंबई : नवाब मलिक यांच्याविरोधात प्राथमिकद‍ृष्ट्या पुरावे उपलब्ध

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना अटक करताना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कुर्ला येथील ज्या मालमत्तेचा उल्लेख केला आहे, ती नवाब मलिक यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे आरोपीने कोणताही गुन्हा केला नाही हा त्यांच्या वकिलांनी केलेला दावा स्वीकारण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

ईडी कोठडी सुनावताना न्यायालयाने काही निरीक्षणे नोंदविली आहेत. त्यातून नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांनी भाऊ अस्लम मलिक यांच्या माध्यमातून ही मालमत्ता हडप केल्याचे प्राथमिकद‍ृष्ट्या दिसून येत असल्याचे मत न्यायालयाने नोंदविले आहे. न्यायालयाच्या आदेशात असेही म्हटले आहे की, आरोपीने महत्त्वपूर्ण पैलूंवरील तपासात सहकार्य केले नाही असे अहवालावरून दिसून येते.

गोव्यात आजपासून कार्निव्हल…खा-प्या-मजा मारा (Photos)

पीएमएलएअंतर्गत केलेला आरोप योग्यच आहे. त्याला वाजवी कारणे आहेत.तपास प्राथमिक टप्प्यावर आहे. या आरोपांच्या समर्थनार्थ गंभीर आरोपांसोबतचे जबाब आहेत. गेली 20 वर्षे आणि त्याहूनही अधिक काळ गुन्ह्याची व्याप्ती असल्याने गुन्ह्याच्या तपासासाठी तपास यंत्रणेला पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button