संजय राऊत, “मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर टीका करणारे नामर्द” | पुढारी

संजय राऊत, "मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर टीका करणारे नामर्द"

पुढारी ऑनलाईन डेस्क : “सध्या कुणालाही ऊठसूठ पद्म पुरस्कार दिले जात आहे. अनेकांना मरणोत्तर पुरस्कार दिले. पण, हयात असताना त्यांचा हा गौरव का नाही? फडणवीस तुमच्या सरकारला बाळासाहेब ठाकरेंना पुरस्कार का द्यावा वाटला नाही? विरोधकांच्या मनातली घाण उघडी झाली. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर टीका करणारे नामर्द आहेत”, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काॅंग्रेसने एकही ट्विट केले नाही, म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलेली होती. त्याला प्रत्त्युतर देताना संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री आजपासून सक्रीय झालेले आहेत. केंद्र सरकारने बाळासाहेबांना पद्मविभूषण पुरस्कार का दिला नाही? यामुळे विरोधकांच्या मनातील घाण उघडी झाली आहे”, अशी टीका संजय राऊत यांनी विरोधकांवर केली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोदींपासून शहापर्यंत आणि फडणवीसांपर्यंत सर्वांनी बाळासाहेबांना ट्विटरवरून अभिवादन केलं. पण सोनिया गांधी, प्रियांका आणि राहुल गांधी यांनी अभिवादनाचं ट्विट केलं नाही. आघाडीत असूनही त्यांनी अभिवादन केलं नाही, हे लक्षात आणून देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “आम्ही बाळासाहेबांबद्दल नेहमी बोलतो त्यांना अभिवादन करतो. आमच्यासाठी ते वंदनीय आहेत. मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांना अभिवादन करणारं साधं ट्विटही केलं नाही. आधी त्यांच्याकडून ट्विट करून दाखवा. ते ट्विटही करत नाहीत. तरीही तुम्ही त्यांच्या मांडिला मांडी लावून बसत आहात. किती लाचार आहात तुम्ही. ज्यांना बाळासाहेबांना अभिवानद करायला लाज वाटते, त्यांच्यासोबत तुम्ही आहात अन् वर आम्हाला ज्ञान पाजळता?.

हे वाचलंत का? 

Back to top button