Uddhav thackeray : '२५ वर्षे आमची युतीमध्ये सडली' | पुढारी

Uddhav thackeray : '२५ वर्षे आमची युतीमध्ये सडली'

मुंबई ; पुढारी ऑनलाईन ; शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती निमीत्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी राज्याला आणि शिवसैनिकांना उद्धेशून संबोधित केले. मागच्या दोन महिन्यांपासून मुख्यमंत्री ठाकरे आजारी असल्याने ते जनतेशी थेट जोडले गेले नव्हते यामुळे ते काय बोलतील याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते.

यावेळी ते म्हणाले की, दिल्ली काबीज करण्याचे स्वप्न शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दिले ते आपण करू, कोरोनाच्या लाटांवर लाटा येत आहेत तर शिवसेनेची लाट आणणार. जे माझ्या तब्बेतीची काळजी घेत आहेत त्यांना मी आपली जागा दाखवणार आहे. जे माझी काळजीवाहू विरोधक आहेत त्यांनी शिवसेना काय आहे ते दाखवणार आहे.

Virat’s Daughter Vamika : विराट-अनुष्‍काची ‘वामिका’ प्रथमच आली कॅमेर्‍यासमोर..!( व्‍हिडीओ व्‍हायरल )

मागची २५ वर्षे आमची युती सोबत सडली गेली. आम्ही भाजपला सोडले, भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. मागची २५ वर्षे आम्ही हिंदुत्वासाठी लढलो त्यांनी हिंदुत्वाच्या नावावर राजकारण केले. हिम्मत असेल लढा षंढासारखे भुमिका घेऊ नका.

भगव्याचा रंग पुसट होत चालला आहे. सोयीप्रमाणे बदलणारे आमचे हिंदुत्व नाही. सत्ता मिळत नाही म्हणून ED लावली जाते. खरे मर्द आणि हिंदू असाल तर काश्मिरपासून ते कण्याकुमारीपर्यंत एक धोरण ठेवा.

आम्ही दोन्ही काँग्रेससोबत युती केली पण आम्ही रात्रीची शपथ विधी घेतली नाही आम्ही सुर्याच्या साक्षीने शपथ घेतली. याला खरे हिंदुत्व म्हणावे असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

राज्यात निवडणुका झाल्या यामध्ये आपण लढलो त्याचा आढावा घेतला तर आम्ही नंबर चारवर आहोत पण आम्ही ज्या जागा लढवल्या त्या आतापर्यंत आमच्या कारकिर्दित जास्त जागा आल्या.

लोकसभा आणि विधानसभा ज्या जिद्दीने लढवतो त्या जिद्दीने आम्ही लढवत नाही. त्यासाठी आपण काम केले पाहिजे. दोन्ही काँग्रेसमधील नेते गावपातळीवर उतरून काम करतात तसे शिवसेनेत होताने दिसत नाही. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

वाघ बघायचा असेल तर बंगालच्या वाघिनीकडे बघा. सगळ्या पळपुट्याना त्यानी सरळ केले.

Back to top button