विरार फाटा भीषण आगीत कोट्यवधींची हानी | पुढारी

विरार फाटा भीषण आगीत कोट्यवधींची हानी

खानिवडे, पुढारी वृत्तसेवा : विरार पूर्वेतील महामार्गावरील विरार फाटा येथे भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. आग विझविण्यासाठी स्थानिक पोलीस घटनास्थळी हजर झाले. तसेच वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थ केले. विरारहून महामार्गाकडे जाणार्‍या रस्त्यावरील समर्थ आटोनजीक आगीची घटना आहे. आगीच्या भडका इतका होता की, ज्वाला बर्‍याच लांबून दिसून येत होत्या. या आगीत मालमत्तेचे कोट्यवधीचे नुकसान झाले असून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

जीवितहानी झाली नसल्याची माहिती आली असून सुरक्षिततेचा सुरक्षेचा उपाय म्हणून या विभागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. आग शमवण्याचे मोठे प्रयत्न सुरू असून आजूबाजूच्या रहिवाश्यांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

Back to top button