Pramila Datar : गायिका प्रमिला दातार यांच्या घरी ३४ लाखांची चोरी | पुढारी

 Pramila Datar : गायिका प्रमिला दातार यांच्या घरी ३४ लाखांची चोरी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

गायिका प्रमिला दातार यांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी दातार यांच्या घरातील 34 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपासासाठी तीन पथके स्थापन करून चेंबूर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमध्ये रहात असलेल्या प्रमिला दातार या 29 डिसेंबर रोजी पुणे येथे मैत्रिणीकडे गेल्या होत्या. त्यांच्या केअर टेकरसुद्धा आपल्या घरी निघून गेल्या. त्यामुळे बंद असलेल्या घराच्या दरवाजाची कडी तोडून चोर आत घुसला. त्याने दातार यांच्या घरातील चार हजार डॉलर्ससह एकूण 34 लाख 43 हजार रुपयांचा ऐवजावर हातसाफ केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी दातार यांच्या केअर टेकर या घरी आल्या असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. तिने लगेचच दातार यांना कॉल करुन याबाबत माहिती दिली. त्यानंतर दातार या पुण्यावरुन घरी परतल्या. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी दातार यांची फिर्याद नोंदवून घेत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button