परभणी : महिला सरपंचास शिवीगाळ करुन पतीस बेल्टने बेदम मारहाण

पूर्णा तालूक्यातील दगडवाडी येथील घटना
Parbhani news
महिला सरपंचाच्या पतीस बेल्टने मारहाण
Published on
Updated on

पूर्णा : तालुक्यातील व गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दगडवाडी येथील ग्रामपंचायत महिला सरपंचास गावातीलच काही सदस्य व माजी सरपंचाने ग्रामसभाच्या वेळी दमदाटी करत धिंगाणा घातला. त्यानंतर महिला सरपंच व ग्रामसेवकास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून सरपंच पतीस कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली व ग्राभसभा उधळून लावली. ही घटना शुक्रवारी (दि.२७) सकाळी १० च्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Parbhani news
ठाणे : एन्काऊंटर | तरीही बालिकेवर लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबेना

याबाबत अधिक अशी, पूर्णा तालुक्यातील दगडवाडी येथे शुक्रवारी (दि.२७) सकाळी १० वाजता ग्रामपंचायतची मासीक ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेसाठी ग्रामसेवक तुकाराम पवार हे आले होते. तसेच महिला सरपंच गंगासागर मुंजाजी वाघमारे ह्याही हजर होत्या. त्यावेळी तिथे ग्रा.पं सदस्य मनोहर मुंजाजी वाघमारे, प्रल्हाद नरसिंग धोत्रे व गावातील लोक बालाजी निवृत्ती वाघमारे, संतोष निवृत्ती वाघमारे, संदिप निवृत्ती वाघमारे, जयकोबा सटवाजी मलांडे हे येवून त्यांनी गावात ग्रामसभा घ्यायची नाही. गावात कोणतीही विकासकामे होऊ देणार नाही, असे म्हणून दमदाटी करत महिला सरपंच गंगासागर वाघमारे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यावरुन पत्नीला शिवीगाळ का करता म्हणून सरपंच पती मुंजाजी मारोतराव वाघमारे ( वय ३८) यांनी विचारणा करताच त्यांना संशयित आरोपी संतोष वाघमारे, संदिप वाघमारे, जयकोबा मलांडे यांनी मारहाण केली. व माजी सरपंच बालाजी निवृत्ती वाघमारे यांनी कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण करुन जखमी केले. यानंतर गावातील काही नागरिकांनी भांडण सोडवले.या घटनेची तक्रार मुंजाजी मारोतराव वाघमारे यांनी दिल्यावरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात संशयीत आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Parbhani news
नवजात मुलीला आईनेच फेकले उकिरड्यावर; वाशिम तालुक्‍यातील घटना

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news