

परभणी : अमोल मिटकरी, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लोकांच्या गाड्या काय फोडता? गाड्या फोडायच्याच असतील तर शरद पवार, उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्यांच्या फोडा, असे प्रक्षोभक विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ते शुक्रवारी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे आयोजित सभेत बोलत होते.
आव्हाड यांच्या गाडीवर गुरुवारी संभाजीराजे यांच्या समर्थकांनी हल्ला केला होता. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. या दोन्ही घटनांमुळे राज्याचे राजकारण तापले असताना आरक्षण बचाव यात्रेवर असलेल्या आंबेडकर यांनी खळबळजनक विधान केले आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात त्यांचे हे विधान चर्चेचा विषय बनले आहे.