गंगाखेड : परभणी जिल्हा महसूल आस्थापनेवरील तलाठी संवर्गातून चार तलाठ्यांची सेवा जेष्ठतेनुसार मंडळ अधिकारी संवर्गात पदोन्नती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी गुरुवारी (दि.८) उशिरा काढले. यामध्ये गंगाखेडचे तलाठी चंद्रकांत नारायण साळवे यांचाही समावेश आहे.
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी गुरुवारी उशिरा काढलेल्या आदेशात जिल्ह्यातील महसुली तलाठ्यांना सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये साळवे चंद्रकांत नारायण (तहसील कार्यालय पालम) यांची मंडळ अधिकारी माखणी (ता.गंगाखेड) येथे, मुर्तुजा रजियाबेगम गुलाम (तहसील कार्यालय जिंतूर) यांची मंडळ अधिकारी वडगाव (ता सोनपेठ) येथे, शिंदे सचिन नानाभाऊ (तहसील कार्यालय मानवत) यांची मंडळ अधिकारी दैठणा येथे, शिवाजी सूर्यकांत मोरे (तहसील कार्यालय परभणी) यांची मंडळ अधिकारी पिंगळी येथे पदोन्नतीवर पदस्थापना करण्यात आलेली आहे.