गंगाखेड येथे टवाळखोरांच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका

Parbhani News | पोलिसांचे कौतुक, दोघांविरोधात गुन्हा
Gangakhed minor girl rescue
गंगाखेड येथे टवाळखोरांच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. File Photo
Published on
Updated on

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : शहरात खासगी शिकवणीसाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीस बळजबरीने ऑटोमध्ये कोंबून शहराबाहेरील निर्जनस्थळी नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन टवाळखोरांना पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे व त्यांच्या टीमने शिताफी ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बुधवारी (दि. ४) दुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली होती. या प्रकरणी रात्री उशिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबद्दल गंगाखेड पोलिसांचे कौतुक होत आहे. या प्रकरणी अनिल बाबुराव जाधव व भैय्यासाहेब शंकर इंगळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील दिलकश चौक परिसरातून दोन युवक एका शाळकरी मुलीस बळजबरीने ऑटोमध्ये कोंबून घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना अज्ञाताने दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी तत्काळ सपोनि आदित्य लोणीकर व सपोनि शिवाजी सिंगनवाड यांच्यासह घटनास्थळी धाव घेत मुलीची सुटका केली. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचाराअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर करीत आहेत.

१० दिवसांपासून सुरू होती मुलीसोबत छेडछाड

अल्पवयीन मुलगी इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहे. ती खासगी शिकविण्यासाठी जात असताना तिचा दोघेजण पाठलग करत होते. तसेच तिच्या अंगावर मोबाईल नंबर लिहिलेली चिठ्ठी फेकून मारत होते. बुधवारी दुपारी पुन्हा दोघांनी मुलीला रस्त्यात पाठलाग करून मला फोन का लावला नाही ? असे विचारले. त्यानंतर मुलीकडून कुठलाच प्रतिसाद न आल्याने तिला ऑटोमध्ये बळजबरीने कोंबून शहराच्या परळी रस्त्यावर निर्जनस्थळी घेऊन जात होते. परंतु पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

Gangakhed minor girl rescue
परभणी : इसाद येथील बेपत्ता शेतकऱ्याचा मासोळी नदीपात्रात आढळला मृतदेह

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news