Nagnath Gundale health news
नागनाथ गुंडाळे यांनी हिवरा (बु) बसस्थानक येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. Pudhari Photo

मराठा उपोषणकर्ते नागनाथ गुंडाळे यांची प्रकृती खालावली

Maratha Reservation | हिवरा (बु) बसस्थानक येथे आमरण उपोषण
Published on

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे -पाटील यांच्या समर्थनार्थ रुपला पांढरी (ता.पूर्णा) येथील नागनाथ गुंडाळे यांनी हिवरा (बु) बसस्थानक येथे शनिवारपासून (दि. २१) आमरण उपोषण सुरू केले आहे. पाच दिवसांपासून अन्न, पाणी त्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. जो पर्यंत मनोज जरांगे यांचे उपोषण चालू राहील, तोपर्यंत आपले उपोषण चालूच राहील, असा निर्धार गुंडाळे यांनी केला आहे.

दरम्यान, त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. उपोषणस्थळी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, सभापती बालाजी खैरे पाटील, मराठा सेवक साहेबराव कल्याणकर, ज्ञानोबा कदम, बालाजी पाटील सुर्यवंशी, पूर्णा साखर कारखाना संचालक श्रीधर पारवे, माजी उपाध्यक्ष शहाजी देसाई यांच्यासह आदींनी भेट देवून पाठिंबा दिला. उपोषणस्थळी नागरिकांची गर्दी उसळत आहे. सध्या ते कोणतेही उपचार घेत नसल्याचे सांगितले जात आहे.

आरक्षणप्रश्नी गुंडाळेवर गुन्हे दाखल

दरम्यान, मराठा आंदोलक नागनाथ गुंडाळे पाटील यांनी या आधी मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको, उपोषणे आदी लढ्यात अग्रभागी सहभाग घेतल्यामुळे त्यांच्या विरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. त्यास न जुमानता त्यांनी आता पुन्हा आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे.

Nagnath Gundale health news
परभणी : आजपासून विशेष ई-पीक पाहणी; अतिवृष्टीतील नुकसानीची नोंद होणार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news