ताडकळस (परभणी) : उपसरपंच म्हणून धुरपताबाई रेश्माजी जल्हारे यांची निवड करण्यात आलीय. रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात सोमवार ५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष बैठकीत ही निवड करण्यात आली.
पूर्णा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कार्यालय असलेल्या ताडकळस येथील उपसरपंच पद रिक्त झाले होते.या पदाच्या निवडीसाठी तहसील कार्यालयाच्या वतीने सर्व ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक ग्राम पंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसरपंच पदासाठी धुरपताबाई रेश्माजी जल्हारे व बालासाहेब डिंगाबरराव आंबोरे या दोघांनी अर्ज दाखल केल्यामुळे प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. एकूण १४ पैकी १३ सदस्य उपस्थित होते. या मतदान प्रक्रियेत धुरपताबाई जल्हारे यांना १० तर बाळासाहेब आंबोरे यांना ३ सदस्यांची मते पडल्याने उपसरपंच म्हणून धुरपताबाई जल्हारे यांची निवड झाल्याचे पिठासन अधिकारी तथा नायब तहसीलदार पंढरीनाथ शिंदे यांनी घोषित केले.
यावेळी धुरपताबाई जल्हारे यांना सरपंच गजानन आंबोरे पाटील, भगवान लाकडे, सौ. शितल दीपक आंबोरे, सौ. छाया सुरेश मगरे, ज्ञानोबा घोडके, सौ. योगेश्वरी गजानन आळणे, सौ. संपदा आंबोरे, धुरपताबाई जल्हारे, खंडेराव वावरे, महादु (बबलू) माने हे दहा तर बाळासाहेब आंबोरे यांना सौ. केसरबाई वामनराव मोहिते, सौ. प्रभावतीबाई दिलीप आंबोरे, बाळासाहेब आंबोरे हे तीन मते पडली. निवड झाल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.