ताडकळस (परभणी) : ताडकळस येथून जवळच असलेल्या २ किमी अंतरावर ताडकळस ते महातपुरी शिवरस्ता रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी अभियान राबविण्यात आले. दि. १९ जून बुधवारी रोजी महाराष्ट्र सरकारच्या वतीने महाराज्यस्व अभियानात ताडकळस ते महातपुरी शिवरस्ता उद्घाटनावेळीच घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ताडकळस शिवारात गट क्रमांक ८७/८८ महातपुरी शिवारात गट क्रमांक ६०/६४/६५ या गटातील शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी असलेल्या शिवरस्तावर अतिक्रमण झाले. याची तक्रार प्रशासनाकडे केली होती. वरीष्ठ कार्यलयात दावे प्रतिदावे करण्यात आले होते. या प्रकरणात प्रशासनाने घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला होता.
अधिक वाचा –
शेतातून शिवरस्ता असल्याचे सांगितले. दि. १० जून बुधवार रोजी उपविभागीय अधिकारी शिवराज डापकर, तहसीलदार माधव बोथीकर, ताडकळसचे सरपंच गजानन आंबोरे,नायब तहसीलदार प्रशांत थारकर, मंडल अधिकारी संजय काकडे, तलाठी मेहराज पठाण, यांच्या हस्ते श्रीफळ फोडून शिवरस्ता अतिक्रमण मुक्त करण्यासाठी उद्घाटन झाले होते. मात्र सुर्यकांत विठ्ठलराव आंबोरे, बालासाहेब उर्फ बबलु सुर्यकांत आंबोरे, शिवरस्ता चुकीच्या पद्धतीने मोजमाप झाल्याचे सांगितले. यावरुन दोन्ही गटातील शेतकऱ्यात वाद होउन दगडफेक झाली.
अधिक वाचा –
काही काळ पूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शिवकात नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेतली वातावरण शांत केले. या दगडफेकीत मोहनराव रंगनाथराव होणमने, शिवराम घाळगीर हे जखमी झाले आहेत. या घटनेची फिर्याद रंगनाथ होणमने यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलीस ठाण्यात सूर्यकांत विठ्ठलराव आंबोरे, बाळासाहेब उर्फ बबलू सुर्यकांत आंबोरे यांच्यावर भा द वि कलम ३०७/३२४//३३६/५०४/३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक वाचा –
आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेण्यात यावे. यासाठी शेतकरी, महिला ताडकळस पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून बसले होते. यावेळी महसूल नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल केला जाईल व शेतकऱ्यांना अतिक्रमण मुक्त रस्ता खुला केला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी गावातील नागरिकाना शांत राहण्याचे आवाहन सरपंच गजानन आंबोरे यांनी केले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेन देशमुख यांनी भेट दिली असून सपोनी कपिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे करीत आहेत.