गंगाखेडात पोलिस भरतीचे बनावट नियुक्तीपत्र देत १२ लाख उकळले

गंगाखेडात पोलिस भरतीचे बनावट नियुक्तीपत्र देत १२ लाख उकळले
Parbhani news
गंगाखेडात पोलिस भरतीचे बनावट नियुक्तीपत्र देत १२ लाख उकळलेfile photo
Published on
Updated on

गंगाखेड : पुणे ग्रामीण पोलिस दलात भरती झाल्याचे बनावट नियुक्तीपत्र देऊन एका महिला उमेदवाराची फसवणूक केल्याप्रकरणी तालुक्यातील पाच जणांविरुद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी फिर्यादी मुक्ता कोंडीराम मुंडे (वय २५, रा. जायकवाडी वसाहत) यांनी मार्च २०२३ मध्ये शहरातील ईदगाह मैदानावर नियमीतपणे पोलिस भरतीचा सराव करत असताना ओळख झालेल्या सुरेखा भागवत फड यांच्या माध्यमातून त्यांचा मावसभाऊ महेश त्र्यंबक भताने यांच्या पुणे पोलिस ग्रामीण दलात खुप ओळखी असल्याची बतावणी केली. पोलिस भरतीचे स्वप्न दाखविले. याच माध्यमातून महेश भताने हा गंगाखेडला घरी आल्यानंतर मुक्ता मुंडे व तिच्या पतीस विश्वासात घेवून त्याने पुणे पोलिसांत भरती करण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून रोख व फोन पेच्या माध्यमातून १२ लाख ५० हजार रूपये नियुक्ती पत्र देण्यासाठी घेतले. त्यानंतर नियुक्तीचा आदेश हा पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकांच्या खोट्या स्वाक्षरीचा दाखवत खरा असल्याचे भासविले.

महेश भताने व गणपत मच्छिंद्र डोंगरे यांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी पुणे येथील भिगवण येथे मुक्ता मुंडे यांच्यासह सुरेखा फड, उद्धव माध- वराव मुंडे (रा. वडवणी), सागर पाटील व बळीराम सोळंके यांना बोलावुन वैद्यकीय तपासणीसाठी ससुन रूग्णालयात येवुन वैद्यकीय तपासणी न करता डॉक्टरांना मॅनेज केल्याचे सांगत वैद्यकीय तपासणी केल्याचेही दाखविले. लवकरच पगार सुरू होईल व त्यासाठी लागणारे कागदपत्रेही घेतले. मात्र बरेच दिवस झाले तरी नियुक्ती पत्र मिळत नसल्याने आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने मुक्ता मुंडे यांनी पैसे परत मागितले. त्यावर सुरेखा फड यांचा भाऊ प्रदीप मुंडे याने जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकारानंतर फिर्यादी मुक्ता मुंडे यांनी गंगाखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महेश भताने, गणपत डोंगरे, भागवत फड, सुरेश फड व प्रदीप सुनिल मुंडे या पाच जणांविरूद्ध गुरूवारी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक आदित्य लोणीकर अधिक तपास करीत आहेत.

Parbhani news
आरोग्य विभागाच्या बनावट नियुक्तीपत्र प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news